बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

खरं बोलणं ही राष्ट्रवादीची संस्कृती नाही-डॉ. भारती चव्हाण

पिंपरी (वास्तव संघर्ष ) : खरं बोलणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची संस्कृती नाही.या पक्षामध्ये मी गेली 28 वर्षे घालवली आहेत. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचे जावई राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्यावर महीलेवर अत्याचार झाल्याचे आरोप होत आहे. या प्रकरणी शरद पवार यांनी हे विषय गांभीर्याने घेतले आहेत. याच प्रकरणांविषयी बोलताना महाराष्ट्र गुणवंत कामगार संघटनेच्या अध्यक्षा डॉ भारती चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये कामगार न्यायालय आणि कामगार उपआयुक्तांचे कार्यालय सुरु करावे या विषयावर आयोजित पञकार परिषदेत बोलत होत्या.

पिंपरी चिंचवड शहर हे जगभर विकसित औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात देशभरातील लाखो कामगार रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले आहेत. येथे औद्योगिक न्यायालय आणि कामगार उप आयुक्तांचे कार्यालय व्हावे. हि लाखो कामगारांची व शेकडो कामगार संघटनांची अनेक वर्षापासूनची मागणी महाविकास आघाडी सरकारने पुर्ण करावी अशी मागणी देखील यावेळी डॉ. भारती चव्हाण यांनी केली आहे.

यावेळी डॉ. भारती चव्हाण, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे, गुणवंत कामगार शिवाजीराव शिर्के, ज्ञानेश्वर मलशेट्टी, श्रीकांत जोगदंड, तानाजी एकोंडे, गोरखनाथ वाघमारे, भरत शिंदे आदी उपस्थित होते.

Share this: