बातम्यामहाराष्ट्र

लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून सकारात्मकतेचे धडे, सकारात्मकता ही काळाची गरज -प्रशिक्षक राहुल बनसोडे

वास्तव संघर्ष..! नाशिक (प्रतिनिधी ) : लॉकडाऊनच्या काळात लोकांचे स्वास्थ आणि मानसिक आरोग्य चांगले राहावे, म्हणून सकारात्मक दृष्टीकोणाची गरज आहे, असे प्रतिपादन राहुल बनसोडे यांनी केले आहे. कोरोनाच्या विळख्यामुळे सम्पूर्ण जग नकारात्मकतेच्या डोहात बुडून गेले आहे. अशा वेळेस लोकांना सकरात्मकेचे धडे देण्याचे काम राहुल बनसोडे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून मोफत करीत आहेत.


नाशिकचे राहुल बनसोडे हे प्रेरणादायी वक्ते असून नुकताच त्यांना ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड चा’ वर्ल्ड रेकॉर्ड सन्मान प्राप्त झाला आहे. ते विविध ठिकाणी शाळा-कॉलेज मध्ये सेमिनारच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना प्रेरणा देण्याचे काम करतात. आजच्या घडीला तंत्रज्ञानाचा वापर करून ते हजारो लोकांपर्यंत पोहचुन त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मानसिक आरोग्य चांगले राहण्याकरिता व नकारात्मकतेच्या काळात जीवनातील सकारात्मकता कशी टिकून राहावी याचे धडे देत आहेत.

यामध्ये आनंदी राहण्यासाठी सकारात्मक ऊर्जेची निर्मिती, आनंदी जीवनाचे सूत्र, NLP, ब्रेन स्टोर्मिंग, स्व-क्षमतांचा विकास, मानवी नातेसंबंध असे विविध विषय घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यांच्या या मोफत कार्यशाळेचा लाभ अनेक लोक वेगवेगळ्या शहरातुन एकाच वेळेस घरी बसून घेत आहेत. समाजमाध्यमातून व सोशल मीडियातून या सामाजिक मोहीमेकरिता सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Share this: