क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

हुंडा न दिल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ ;सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड शहराच्या सांगवी परिसरात एका विवाहितेचा हुंडा न दिल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी छळ केला आहे . ही घटना 1 सप्टेंबर 2012 पासून 15 ऑक्टोबर 2020 या कालावधीत जुनी सांगवी येथे घडली.

याबाबत 26 वर्षीय पिडीत विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पती राहुल वसंत पवार, दीर बबलू वसंत पवार, जाऊ वंदना बबलू पवार, लहान दीर नितीन पवार (सर्व रा. जुनी सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती राहुल याने घरातील किरकोळ कारणांवरून विवाहितेला घालून पाडून बोलून शिवीगाळ केली. ‘मला तुझ्यासोबत राहायचे नाही. तुझ्या माहेरच्यांनी हुंडा दिला नाही’ असे म्हणून राहुल याने मारहाण केली.

अन्य आरोपींनी पती राहुल याला विवाहितेविषयी भडकावून मारहाण व शिवीगाळ करण्यास सांगत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत

Share this: