बातम्या

पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसन समितीला आंबेडकर घराण्याचा पाठिंबा ;अंजलीताई आंबेडकर यांच्या सोबत बैठक सम्पन्न

पहिल्या छायाचित्रात प्रा. अंजलीताई आंबेडकर पाठिंबा देताना दुसर्‍या छायाचित्रात सुजात प्रकाश आंबेडकर आणि गांधीनगर पुनवर्सन समिती सदस्य

पिंपरी ( वास्तव संघर्ष ) – पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीचे जागेवरच पुनर्वसन करावे . कुटुंबाप्रमाणेच प्रत्येकाचा सर्व्हे करावा , तसेच प्रत्येक सदनिका ही ५५० चौरस फुटांची असावी अशा विविध मागण्या फुले , शाहू , आंबेडकर प्रणित गांधीनगर झोपडपट्टी पुनवर्सन गृहनिर्माण संस्था द्वारे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

गांधीनगर झोपडपट्टी पुनवर्सन समितीच्या या मागण्यांना प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी पाठींबा दिला आहे. या बैठकीत सुजात प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते . यावेळी , गौतम गजभार, विनोद जाधव, अॅड. अतुल कांबळे, विजय गायकवाड, मनोज गजभार, प्रविण कांबळे, विष्णु सरतापे, राजेंद्र साळवे आणि दिपक साबळे उपस्थित होते. ही बैठक आंबेडकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आली.

या बैठकीत अंजली आंबेडकर म्हणाल्या, गांधीनगर झोपडपट्टी मधील रहिवाशांसोबत आणि गांधीनगर पुनवर्सन समिती बरोबर आंबेडकरी घराणे देखील लढा देईल हक्काचे घर गोरगरीबांना दिले जाईल तसेच त्यांचे त्याच जागी पुर्नवसन होईल यासाठी आम्ही पालिका स्तरावरही चर्चा करू कोणालाही घरापासून वंचित ठेवण्यात येणार नाही. असे देखील यावेळी त्या म्हणाल्या

Share this: