क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

तो हल्ला राजकिय द्वेषातून ;सुञधारांना शोधा अन्यथा आमरण उपोषण – दत्ता साने

पिंपरी (वास्तव संघर्ष ) गेल्या वर्षी जून महिन्यात माझ्या कार्यालयावर केलेला भ्याड हल्ला हा रावण टोळीने सुपारी घेऊन केला असून तो हल्ला राजकीय द्वेषातून केला आहे या सुञधारांना लवकरात लवकर पकडा अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकड़े केली अन्यथा पोलिस आयुक्त कार्यालय समोर येत्या 2 मार्च 2020 रोजी परिवारसह आमरण उपोषण करणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषेदेत माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांनी केली आहे.

07/06/2019 रोजी सायंकाळी 4:30 वाजता सहा – सात अज्ञात हल्लेखोरांनी माझ्या साने चौक, चिखली येथील संपर्क कार्यालयावर हल्ला करून कार्यालयातील संगणक, माझ्या फोटोवर कोयत्याने वार केले व इतर साहित्याची मोडतोड करून मोठया प्रमाणावर नुकसान केले . माझ्या फोटोवर ज्याअर्थी त्यांनी वार केले त्याअर्थी त्यांना माझ्यावर जिवघेणा हल्ला करून मला संपवण्याचा मुख्य उद्देष होता हे सिध्द होत आहे.

त्या अनुषंगाने मी याबाबत रीतसर तक्रार केली व्यवस्थीत तपास जमत नसल्याने तो तपास क्रार्इम युनिट 01 यांचेकडे देण्यात आला तपासामध्ये एक तर कोणाला तपास करता येत नाही किंवा कोणाच्यातरी सांगण्यावरून तपासामध्ये वारंवार फेरबदल करत असल्याचे दिसुन येते व यामुळे पोलीस तपासकावर देखील संशय बळावतो. 

तपासामध्ये खुप मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. यामुळे त्यांच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याचे दिसुन येत आहे. तसेच या गुन्हयातील एकुण 07 आरोपीपैकी 07 आरोपी सापडलेले असुन त्यांच्या कडून कोणत्याही प्रकारची कबुली मिळाली नाही. सायबर सेल कडुन आपण स्वत: लक्ष घालुन हल्यातील मुख्य आरोपी व सुत्रधार कोण आहेत याबाबत सत्य परीस्थिती उघडकीस आणावी. 
या गुन्हयातील आरोपीबाबत मी स्वत: त्यातील सुटलेल्या आरोपीबरोबर बोललो असता खाजगीरीत्या चौकशी केली असता अशी माहीती समोर येत आहे की, या हल्यामागे पांडुरंग बाळासाहेब साने यांनी माझ्या हत्येची सुपारी रावण टोळीतील दिनेश रेणवा याला दिलेली असुन, दिनेश रेणवा हा पांडुरंग साने यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे 

भोसरी विधानसभा आमदारसुध्दा सामील आहेत व त्यांचे बगलबच्चे यांच्याशी संबंधित असलेल्या गुन्हेगारांमार्फत हा कट रचण्यात आला माझे राजकीय शत्रु हेच आहेत.हल्लेखोर हे रावण टोळीमधील असुन ही टोळी रोख रक्कम घेवुन जीवे मारण्याची सुपारी रोख घेतात. याचा अर्थ असा होतो की, या गुन्हयात कोणीतरी एजंट असल्याचे दिसुन येते. मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे गृहखाते होते त्याचा पुरेपुर गैरफायदा घेवुन किंवा तपासाची दिशाभुल करून तपासाची दिशा मुद्दाम दुसरीकडेच नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे असा माझा गंभीर पत्रकार परिषेदेत साने यांनी केला आहे

Share this: