बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सावित्रीबाई फुले इंग्रजांकडे धुणी-भांडी करत होत्या ;पिंपरी चिंचवड भाजप महीला महापौरांचे अकलेचे तारे

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषाताई उर्फ माई ढोरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निम्मित आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात व्यक्त केलेल्या आक्षेपार्ह मनोगताबद्दल भारिप बहुजन महासंघांने खुलासा मागितला असून त्यांचा तात्काळ राजीनाम्यांची मागणी केली आहे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषाताई उर्फ माई ढोरे यांनी पहिल्या स्त्री शिक्षिका, स्रीवादाच्या जनक,विद्रोही कवियत्री,लेखिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निम्मित “फिनिक्स सोशल ऑर्गनायझेंशन” यांच्या विद्यमाने यश जेष्ठ नागरिक संघ,यश प्राईड इमारत,चंद्रमनी नगर,जुनी सांगवी २७. या ठिकाणी शुक्रवार, दिनांक ३/१/२०२० रोजी सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारीप बहुजन महासंघांने महापौर यांचे पद रद्द करावे असे पञ पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आयुक्त यांना दिले तसेच महापौरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासंदर्भात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना देखील निवेदन पञ देण्यात आले आहे


सदर कार्यक्रमाला विशेष सत्करार्थी म्हणुन पिंपरी चिंचवड शहराच्या प्रथम नागरिक मा. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विषयी “त्या इंग्रजांच्या कडे धुणी-भांडी करीत असुन तेथुनच त्यांनी शिक्षण व इंग्रजी भाषा आत्मसात केली असल्याचे म्हंटले होते. या निवेदनात म्हटले आहे सदर मनोगत हे प्रमाणित भारतीय इतिहासाशी विसंगत असुन एका जबाबदार पदावर असताना मा. महापौरांनी केलेले वक्तव्य निश्चितच निंदनीय असुन त्यांच्या पदाची आचारसंहिता भंग करणारे आहे. मा. महापौर यांच्या या मताचा पिंपरी-चिंचवड धिक्कार करीतो व त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करीत आहोत. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे तत्कालीन भारतातील सामाजिक, धार्मिक ,शैक्षणिक व स्त्रियांचे शोषण करणारी समाजव्यवस्था व यातील सुधारणांन मधील वाटा हा फार मोठा व दखलपात्र आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीमाई यांना कशा प्रकारे या मध्ये सहभागी करून घेतले हा जगमान्य इतिहास आहे. असे असताना मा. महापौर यांनी काढलेले हे उद्दगार हे इतिहासाची अवहेलना करणारे असुन तमाम बहुजन समाजासह स्त्रियांचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान असलेल्या सावित्रीमाई फुले यांचा अवमान असल्याचे आम्ही समजतो.

सदर निवेदनाद्वारे आपणांस विनंती की आपण या संदर्भात मा. महापौर यांच्या कडुन खुलासा मागवून तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा. तसेच त्यांनी हे मनोगत ज्या संदर्भ ग्रंथ अथवा पुस्तकांतून घेतले असतील ते ते ग्रंथ इतिहास व महापुरुष या दोघांचा अवमान करणारे असुन या मधुन करण्यात होणाऱ्या महापुरुषांचा अपमान व प्रमाणित इतिहासाचे विकृतीकरणावर आळा घालण्यासाठी या संदर्भ स्रोतांवर योग्य ती कारवाई करण्याची तजबीज करावी या निवेदनात
भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष मा. इंजि. देवेंद्र तायडे मा. राहीमभाई सय्यद , मा. मा.धनंजय कांबळे मा. एस. आर. गायकवाड , मा.बबन सरोदे मा. रवींद्र पारधे मा. सुरेश गायकवाड यांच्या सह्या आहेत.

माता सावित्रीमाई फुले यांच्यामुळेच मी महापौर या पदांवर असून भारीप बहुजन महासंघांने असे पञ काढून माझी बदनामी केली आहे. त्यांनी या बद्दल पुरावा द्यावा -उषाताई उर्फ माई ढोरे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Share this: