बातम्या

महापौर राहुल जाधव यांनी खरंच केला का हवेत गोळीबार ;काय आहे वायरल फोटोमागंच वास्तव..!

दिपक साबळे

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड मनपाचे महापौर राहुल जाधव यांनी आपल्या आश्वासनानुसार ७ आॅगस्ट रोजी पवना धरणात जाऊन आपल्या पत्नीसमवेत धार्मिक विधी करून जलपूजन केले . त्यानंतर लवकरच नगराध्यक्षांनी रहिवाशांना आजपासून दररोज पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले.

दिलेल्या शब्दाला जागणारे महापौर अशी ख्याती मिळवली माञ त्याबरोबर महापौर अफवेच्या पाण्यात गेले. झालं असे की, स्वसंरक्षणासाठी मिळालेली पिस्तूल पावसामुळे भिजली आणि महापौरांनी ती रुमालाने पुसण्यासाठी बाहेर काढली मात्र काहींनी पिस्तुल कधी आयुष्यात पाहीले नसेल म्हणून त्यांचा पिस्तुल हातात घेण्याचा मोह आवरला नाही त्यातच अतिउत्साही लोकांनी पिस्तुलाचे फोटोशुट घेतले. आणि हेच फोटो महापौरांच्या अडचणीचे कारण ठरले मग काय काही मिनिटांत सोशलमिडीयावर फोटो वायरल झाले. नंतर पिस्तुलमधुन महापौरांनी हवेत गोळीबार केला अशा अफवा शहरभर पसरल्यामुळे महापौरांना अनेक आरोपांना सामोरे जावे लागले.

हल्ली एखादी गोष्ट सोशलमिडीयावर वायरल होण्याचा ट्रेन्ड आहे. पण वायरल फोटोमागंच वास्तव बहुतेकांना कळतं नाही म्हणून नाहक त्रास अनेकदा काहींना सहन करावा लागतो. त्यात महापौर राहुल जाधव देखील अडकले की अडकवले हा प्रश्न उपस्थित राहतो.

दरम्यान, , महापौर राहुल जाधव यांच्या पत्नी, शहरातील पञकार, महापालिकेतील अधिकारी, विरोधीपक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांच्यासमोर महापौरांनी हवेत गोळीबार केला अशी जी अफवा परवली जात आहे हे सामान्य माणसाच्या तर्कबुध्दीच्या पलिकडे आहे.

Share this: