बातम्या

पिंपरी-चिंचवड :आमदार गौतम चाबुकस्वारांवर गुन्हा दाखल..!

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :-  कै. हितेश गोदूमल मूलचंदानी यांचा खून (दि. २३ जुलै) रोजी झाला. याबाबत पिंपरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा (गुन्हा रजिस्टर क्र. ८१७/२१९ (दि. २३ जुलै) रोजी दाखल आहे. याबाबत पोलिस योग्य तपास करीत ओहत. मात्र पिंपरीचे स्थानिक आमदार गौतम चाबुकस्वार व इतर हे माझ्या विषयी राजकीय हेतूने प्रेरीत होत विनाकारण माझी कौटुंबिक, सामाजिक, राजकीय प्रतिष्ठा खराब होईल या उद्देशाने सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रचार, प्रसार करीत आहेत.

राजकीय हेतूने मला गुंतवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती नगरसेवक डब्बू आसवानी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.२३जुलैला पिंपरी येथे हितेश गोधुमल मूलचंदानी याचा खून झाला, याबाबत पोलिस योग्य तपास करीत आहेत. परंतु पिंपरीचे स्थानिक आमदार गौतम चाबुकस्वार व इतर हे माझ्याविषयी राजकीय हेतूने प्रेरित होत विनाकारण माझी कौटुंबिक सामाजिक राजकीय प्रतिष्ठा खराब होईल या उद्देशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करीत आहेत.

खून झालेल्या व्यक्तीचे वडील गोधूम अल मूलचंदानी यांच्यावर माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात व माननीय न्यायालयात जबाब द्यावा यासाठी आमदार गौतम चाबुकस्वार हे मोबाईल वरून दबाव आणीत आहेत त्यामुळे गोधूम अल मूलचंदानी व आमचे कुटुंब प्रचंड ताण तणावात आहेत.या प्रकरणात जाणून-बुजून खोटी व चुकीची माहिती व्हाट्सअप वर फेसबुक वरून पसरवली जात आहेत पिंपरीतील वातावरण शांत करून तणाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे याबाबत माझ्याकडे संबंधितांचे झालेले फोन रेकॉर्ड रिंग व्हॉट्सऍप रेकॉर्डिंग चे डिटेल्स आहेत.याविषयी मी पिंपरी पोलीस चौकी येथे आमदार गौतम चाबुकस्वार यांचे विरुद्ध भा.द.वि कलम ५०९,३४,५०६ नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर हीरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी गुरुवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी कै. हितेश मुलचंदानी याचे वडील गोधूम मूलचंदानी उद्योजक राजुशेठ आसवानी आदी उपस्थित होते

Share this: