पिंपरी-चिंचवड :अरे-देवा! नवीन दाखवून जुन्याच बसचे रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड दर्शन बस सेवेचा उद्घाटन समारंभ शनिवार दि. ३ आॅगस्ट २०१९ रोजी दुपारी तीन वाजता अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल, भक्ती शक्ती चौक निगडी येथे आयोजित करण्यात आले असल्याचे महापौर राहुल जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरातील ऐतिहासिक स्थळे आणि पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पीएमपीएलने महागड्या बससेवाचे शुभारंभ करीत असून त्याचे उद्घाटन केंद्रीय राज्य सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी , शहर आमदार, खासदार, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी इत्यादी उपस्थित राहणार आहेत. महापौर राहुल जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी पीएमपीचे अध्यक्ष माने , स्थायी समितीचे सभापती विलास मडेगिरी उपस्थित होते. या बसमध्ये शहरातील ऐतिहासिक स्थळे यांना भेट देण्यासाठी सामान्य नागरिकांना प्रत्येकी ५००रुपये इतकी किंमत मोजावी लागणार आहे, जी बरीच महाग आहे. हे भाडे पुण्याच्या धर्तीवर निश्चित करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या तुलनेत १६ कि.मी. दृष्टिकोनापेक्षा कमी आहे.
विशेष म्हणजे या पिंपरी चिंचवड दर्शन बसचे भाडे निश्चित करताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर, स्थायी समिती सभापती, सत्ताधारी नेते, विरोधी पक्षनेते, सर्वांना अंधारात ठेवले पीएमपी बैठकीत कोणालाही बोलावले जात नाही. महापौर, सभापतींनी स्वत: ही कबुली दिली महागड्या भाडेवाढीबाबत महापौरांनी विचारले असता, अध्यक्षांनी पीएमपीच्या महाव्यवस्थापकांना पुण्याचे भाडे दर्शविण्यास सांगितले. दर कमी झाल्यावर प्रतिसाद मिळाल्यानंतर दोन्ही दर वाढवण्याची सूचना केली. परंतु त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले गेले, त्यांना काहीच कळले नाही. महापौरांनी बस नवीन आहेत का असे विचारले असता पुण्यातील जुन्याच दोन बस उद्घाटनाला आणणार आहे असे उत्तर दिले. मंञी रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन होणा-या महागड्या एसी बसेस नवीन नसून जुन्या आहेत ही तर पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांची लूट आहे.
प्रश्न असा आहे की जर संपूर्ण शहर टुव्हिलरवर फिरले तर सुमारे ७० रुपये जाऊ शकते तर मग ५००रुपये खर्च करून या जुन्या बसचा प्रवास नागरिक करतील कशाला फक्त देखावा करण्यासाठी आठवले यांच्या हस्ते उद्घाटन का?