आरोग्यबातम्या

खवैय्यांना खुनावतेय हॉटेल पाटील पॅलेसची खास श्रावण थाळी

पिंपरी, प्रतिनिधी :
श्रावण महिन्यात नॉन व्हेज नाही, म्हणून निराश न होताही अनेकजण वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत असतात. श्रावण महिना तसा बहुतांश लोकांसाठी खास असतो. श्रावण साजरा करायचा तर मेन्यूही स्पेशल हवा. खवैय्यांची गरज लक्षात घेऊन चिंचवड-वाल्हेकरवाडी रस्त्यावरील हॉटेल पाटील पॅलेसने खास श्रावणथाळीचे नियोजन केले आहे. दरम्यान, पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मोफत फराळ आणि चहाचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती हॉटेल पाटील पॅलेसचे मालक बंडू मारकड पाटील यांनी दिली.
श्रावणातल्या सोमवारचा उपवास सोडण्यासाठी कमी तेलात बनविलेल्या भाज्यांना खवैय्याची पसंती असते. हे गृहीत धरून महाराष्ट्रीय जेवण, तसेच पंजाबी थाळी असणार आहे. अगदी महाराष्ट्रीय झुणका-भाकरी पासून ते पंजाबी पनीर स्पेशल भाज्या खवैय्यांना चाखता येणार आहेत. खास श्रावण महिना लक्षात घेऊन एक वैशिष्ट्यपूर्ण थाळी बनविण्यात आली असून, या थाळीत तिखट पदार्थांच्या बाबतीत पातळ भाजी, पनीर स्पेशल भाजी, मटकी-मूग उसळ, तर गोड पदार्थांमध्ये गुलाबजाम, जिलेबी, तुपातला शिरा; तसेच पापड, दही आणि चपाती, तंदूर रोटी, बटर रोटी, नान, भाकरी या पदार्थांचा या थाळीत समावेश असणार आहे. खवैय्यांनी या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल पाटील पॅलेसला भेट देण्याचे आवाहन बंडू मारकड पाटील यांनी केले आहे.

Share this: