बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

शब्दधन जीवन गौरव राज्यस्तरीय बाल-कुमार साहित्य संमेलनाच्या स्वागताक्षपदी अरूण पवार

पिंपरी, (वास्तव संघर्ष) प्रतिनिधी : शब्दधन जीवन गौरव काव्यमंचच्या वतीने आयोजित पहिल्या ‘शब्दधन जीवन गौरव राज्यस्तरीय बाल-कुमार साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी समाजसेवक व मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार यांंची एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती संमेलनाचे समन्वयक प्रा. संपत गर्जे यांनी दिली. यावेळी शब्दधन जीवनगौरवचे दिगंबर शिंदे, कवी हरिदास कोष्टी, दीपक अमोलिक, समन्वयक समिती सदस्य प्रा. प्रशांत शेळके, राहुल इंगळे, उमेश कुंदे, सोमनाथ वाघ आदी उपस्थित होते.

प्रा. संपत गर्जे यांनी सांगितले, की पिंपरी-चिंचवड शहरात येत्या नोव्हेंबरमध्ये बाल-कुमार साहित्य संमेलन होणार आहे. या बाल-कुमार साहित्य संमेलनाची तारीख व कार्यक्रमांची रूपरेषा तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच तारीख व ठिकाण जाहीर करण्यात येईल. अरुण पवार यांचे सामाजिक क्षेत्रातील काम सर्वश्रुत आहे. तसेच उदयोन्मुख साहित्यिक, कीर्तनकार, प्रवचनकार यांना सहकार्य मिळत असते. बालकांसाठी शिवशौर्य शिबीरे, अनाथ मुलांना कपडे आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत आदी सामाजिक उपक्रम अरुण पवार राबवित असतात. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून त्यांची या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Share this: