सहाव्या मजल्यावरून पडून देखील महीला आश्चर्यजनकरित्या बचावली ;कारण ऐकून बसेल धक्का
पिंपरी (वास्तव संघर्ष) : विवाहित महिलेने राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र देवबलवत्तर म्हणून ती महीला वाचली . ही घटना चिखलीत आज सकाळी घडली . जखमी महिलेला उपचारासाठी वायसीएम रूग्णालयात आणले .महिलेची प्रकृती स्थिर असून तिला पुढील उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवण्यात येणार आहे .
रूपाली आकाश पाचंगे ( वय 20 रा. चिखली ) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचं नाव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , रूपाली पाचंगे या विवाहीतेने फिनेल पिऊन राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली . मात्र देवबलवत्तर म्हणून ती महीला वाचली. महिला खाली कच – याच्या गाडीत पडल्या कारणाने वाचली . उपचारासाठी तिला तात्काळ पिंपरीतील यशवंतराव चव्हाण ( वायसीएम ) रूग्णालयात हलवण्यात आले .
दरम्यान, या विवाहितेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र उपचार सुरू असताना महिलेच्या सासर व माहेरच्या लोकांमध्ये वायसीएम समोरच हाणामारी झाली आहे. यामध्ये सात ते आठ जणांमध्ये मारहाण होऊन ते जखमी झाले आहेत. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.