बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पाणी पुरवठा विभागाचा कार्यभार तातडीने सवणे यांच्याकडे द्या – विरोधीपक्षनेते नाना काटे

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के  भरले असतानाही पिंपरी चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. त्यामुळे नागरीकांची गैरसोई होत होती. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नियमित पाणी पुरवठा चालू केला मात्र आठच दिवसात पुरेश्या दाबाचे कारण देत आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी सवणे यांना द्यावा अशी मागणी  मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांना पञाद्वारे केली आहे.

काटे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे की, पाणीपुरवठा नियमित होत नाही नाही यामुळे नागरीकांमध्ये नाराजीची भावना आहे. त्यामुळे मागील सर्वसाधारण सभेमध्ये आठ तास वादळी चर्चा झाली व अँट्रोक्लस्टर येथे पाणी पुरवठा विषयक  सखोल चर्चा करण्यासाठी अधिकारी आणि नगरसदस्यांची मिटींग ठेवली होती. त्या चर्चेमध्ये सर्वपक्षीय नगरसदस्यांनी पाणी पुरवठ्याबाबत अडचणी मांडल्या. या सभेमध्ये सर्वपक्षीय सदस्यांच्या भावना अतिशय तीव्र झाल्या होत्या. पाणी पुरवठ्याचे प्रमूख श्री. तांबे  यांच्यावर सर्वांनी आरोप केले त्यामुळे त्या भरसभेत, सर्व नगरसदस्यांच्या उपस्थित पाणी पुरवठा विभागाचा कार्यभार तांबे यांच्याकडून  काढून श्री.सवणे, कार्यकारी अभियंता यांच्याकडे तसेच श्री. सवणे यांच्याकडील बी.आर.टी. चा कार्यभार श्री. गट्टूवार यांच्याकडे सोपविण्याची मागणी केली आहे.

 दरम्यान, आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक मयुर कलाटे , नगरसेवक संतोष कोकणे, नगरसेवक अपर्णा डोके, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेवक  राजू बनसोडे, नगरसेवक  सुलक्षणा शिलवंत – धर यांच्या सह्या आहेत.

Share this: