श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी धरणे आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याचे प्रकरण
पिंपरी(वास्तव संघर्ष) छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री श्री रविशंकर यांचेवर गुन्हा दाखल करावा, याकरिता संभाजी ब्रिगेडच्या वतीने थेरगावमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य सांभाळून व लढाया करुन थकुण गेले आहेत. रामदास स्वामी स्वराज्याचे राजे आहेत.
शिवाजी महाराज रामदासाचे शिष्य आहेत. तसेच रामदास स्वामीच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज आपले गुडघे टेकून आपला मुकुट आणि तलवार रामदासाच्या चरणी अर्पण असलेचा व्हिडिओ श्री श्री रविशंकर यांनी आपल्या अधिकृत युट्युब चैनलवरुन प्रसारीत केलेला आहे. या आशयाचा लेख देखील प्रकाशित केलेला आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे हे प्रशासनाकडे गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक ते पुणे जिल्हाधिकारी लेखी तक्रार देत पाठपुरावा करीत आहेत. तरी देखील गुन्हा दाखल न करण्यात आल्याने अखेर थेरगाव येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश समन्वयक शांताराम बापू कुंजीर म्हणाले की येत्या आठ दिवसांत श्री श्री रविशंकर याचेवर गुन्हा दाखल न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, यांनी येत्या चार दिवसांत पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असे सांगितले,तर सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक मारुती भापकर यांनीही आठ दिवसांत गुन्हा दाखल केला नाही तर पोलीस आयुक्तालया समोर आमरण उपोषणाचा इशारा दिला. छावाचे धनाजी येळकर पाटील राजेंद्र देवकर यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिध्दीक शेख व रयत विद्यार्थी मंच चे धम्मराज साळवे, BRSP चे सुनील कांबळे, तसेच समाजवादी पक्षाचे नरेंद्र पवार, व मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, या सर्व संघटनेच्या पदाधिकार्यांनी श्री श्री रविशंकर याचेवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी अॅड सुजीत बाकले, ज्ञानदेव लोभे, सतिश कदम, सुनील साळुंके, दिपक खैरनार, संतोष बादाडे, रशीदभाई सय्यद, दिपक जोगदंड, विनोद घोडके, परशुराम रोडे, उध्दव शिवले, अशोक सातपुते,एम एम इनामदार, भैय्यासाहेब गजधने, संतोष शिंदे, बाळासाहेब साने, अंबादास जाधव, अनिल ताडगे, सुभाष जाधव, अनिल सावंत, सागर आवटे, जयश दाभाडे, संजय बनसोडे, विनायक जाधव,भारत मिलपगारे, अजय लोंढे, सुभाष साळुंके,सागर तापकीर, अभिषेक म्हसे, निलेश शेंडगे, सुभाष गुंगाराव, संतोष वाव्हळ, प्रमोद शिंदे, बबलू काळे, गौरव धनवे, हमीद शेख, यांच्यासह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते. आभार गणेश दहिभाते यांनी व्यक्त केले.