Videoबातम्या

शरद पवार कॉग्रेसचे वकिल त्यांना आता पर्याय नाही-मुख्यमंत्री

मुंबई : काँग्रेस पक्षाला पवारांसारखा मोठा वकील लाभला आहे. त्यांना काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर जर कोण मान्य करत नसेल तर त्यांनी नेता म्हणवून घेऊ नये, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे तुम्ही त्यांनाच विचारा, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. आगामी काळात निवडणूक आम्ही राष्ट्रवादी-काॅग्रेसच्या विरोधात लढवणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Share this: