पिंपरी:चक्क महिला चालवणार अॅटो रिक्षा
पिंपरी (वास्तव संघर्ष) कष्टकरी कामगार पंचायत आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी गुरुवारी (दि. 3 जानेवारी 2019) शंभर महिला रिक्षा चालकांना परमिट आणि नविन रिक्षा वाटप परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. एकाच वेळी शंभर महिलांना परमिट आणि नविन रिक्षा वाटप करण्याचा हा उपक्रम देशात पहिल्यांदाच होत असल्याची माहिती कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी दिली.
सोमवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी कार्यक्रमाचे निमंत्रक कष्टक-यांचे नेते बाबा कांबळे, संयोजिका आशा कांबळे, प्रल्हाद कांबळे आदी उपस्थित होते.
ॲड. चाबुकस्वार यांनी सांगितले की, यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील आदर्श रिक्षा चालकांचा पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महापौर राहुल जाधव, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे, आमदार महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, आयुक्त श्रावण हर्डीकर, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक विलास मडेगिरी, शत्रूघ्न काटे, प्रमोद कुटे, जावेद शेख, राहुल भोसले, माजी नगरसेवक तानाजी खाडे, राष्ट्रसेवा दलाचे अभिजित वैद्य, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, उद्योजक बशीर सय्यद, परिवहन आयुक्त शेखर चिन्ने, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर, टी.व्ही.एस. मोटर कंपनीचे जनरल मॅनेजर एस. एस. कृष्णकुमार, रिजनल मॅनेजर शिवानंद लामदाडे आणि दिक्षा संघटनांचे भारतातील व राज्यातील प्रमुख पदाधिकारी आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
शहरातील काबाड कष्ट करणाऱ्या साफसफाई कामगार धुणी-भांडी, घरकाम, कागद-काच पत्रा वेचक आदी कामे करणाऱ्या महिलांना ‘घरकाम महिला सभा’ या संस्थेच्या अध्यक्षा आशा कांबळे यांच्या वतीने रिक्षाचे रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच त्यांचे आर.टी.ओ. कार्यालयामधून रिक्षाचे लायसन्स, बॅच आणि परमिट काढून देण्यात आले. आता ह्या शंभर महिला, भगिनी स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभ्या राहतील आणि स्वाभिमानाने आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवतील.
त्यांना टीव्हीएस कंपनीच्या रिक्षांची चावी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. कंपनीच्या वतीने त्या शंभर महिलांना संगणक किंवा 32 इंच टिव्ही भेट म्हणून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या संयोजनात प्रल्हाद कांबळे, विनोद वरखडे, बळीराम काकडे, धर्मराज जगताप, विकी तामचीकर, रमेश शिंदे, सदाशिव तळेकर, मल्हार काळे, किरण साळवे, गणेश चव्हाण, लक्ष्मी सुर्यवंशी, सोमनाथ कलाटे, सुदाम बनसोडे, बाळासाहेब डुंबरे, महादेव थोरात, बाळासाहेब सुर्यवंशी, दिलीप साळवे, महेश कांबळे, गोकुळ रावळकर, दत्ता भोसले, इकबाल शेख, जेकब मॅथ्यू, नाना गाडे, वकील शेख, संतोष जाधव, सचिन म्हेत्रे, नितीन कसबे, बाबा जोगदंडे, अनिल बराटे, रज्जाक शेख सहभाग घेतला आहे.