बातम्यामहाराष्ट्र

बनावट स्टँप घोटाळा :मृत्यूनंतर अब्दुल करीम तेलगी निर्दोष


नाशिक – देशभर गाजलेल्या बनावट स्टँप घोटाळ्यातील प्रमुख आरोपी दिवंगत अब्दुल करीम तेलगीसह सर्व ७ आरोपींची सोमवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने भक्कम पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. नाशिक येथील प्रतिभुती मुद्रालणायातुन नादुरुस्त झालेले यंत्र अधिकार्‍यांना हाताशी धरुन खरेदी केले व त्याआधारे स्टँप छापून घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. 

नाशिकरोडच्या प्रतिभुती मुद्रणालयातील मुद्रांकाची चोरी करून ख्याती मिळविलेल्या अब्दुल करीम तेलगी याने मुद्रणालयातील अधिकाऱ्यांनाही हाताशी धरल्याची बाब तपासाअंती निष्पन्न झाल्याने मुद्रणालय चर्चेत आले होते. नाशिकमध्ये तेलगीसह सात आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र केंदीय अन्वेषण विभागाने नाशिकच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आले. परंतु जो पर्यंत तेलगी न्यायालयात हजर होत नाही तो पर्यंत या खटल्याचे काम पुढे सरकणार नसल्याने सीबीआयचे विशेष वकील विश्वास पारख यांनी सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला.

तेलगीला एड्स झाल्यामुळे त्याला न्यायालयीन सुनावणीत गैरहजर राहण्याची अनुमती मिळावी यासाठी त्याच्यावतीने खुप प्रयत्न करण्यात आले. परंतु पारख यांनी चिकाटीने सीबीआयच्या मागे लागून कधी हैद्राबाद तर कधी बेंगलोर न्यायालयात पाठपुरावा करून अखेर २०१३ मध्ये अब्दुल करीम तेलगी याच्या नावाने वॉरंट घेतले अखेर पोलीस बंदोबस्तात तेलगी नाशिकच्या न्यायालयात हजर झाला. गेल्या वर्षी आॅक्टोंबर महिन्यात त्याचे तुरूंगातच निधन झाले होते. त्याच्या अनुपस्थितीत या खटल्याचे कामकाज चालले, त्यात तो मृत्यूनंतर निर्दोष साबीत झाला.

Share this: