बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी

निगडीच्या सौंदर्याला बाधा येत असल्याने भाजप निगडी अध्यक्ष किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी

वास्तव संघर्ष निगडी – येथील दिवंगत महापौर मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील मुख्य रस्त्याच्या पदपथावर शेकडो भिक्षुकांनी कुटुंबासह ताबा घेतला असुन दिवसेंदिवस यांची संख्या वाढतच चालली आहे, उघड्यावरच त्यांनी संसार मांडला असुन स्वच्छतेला व निगडीच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे त्यामुळे तात्काळ या भिक्षुकांना हटविण्यात यावे व मानवतेच्या दृष्टिकोनातुन त्यांची दुसऱ्या ठिकाणी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी भाजप निगडी अध्यक्ष किशोर हातागळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात किशोर हातागळे यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे त्यात असे नमुद करण्यात आले आहे की, “निगडी येथील दिवंगत महापौर कै.मधुकरराव पवळे उड्डाणपुल हा निगडी टिळक चौकातील महत्वाचा केंद्रबिंदु असुन येथे शेजारीच निगडी बसस्थानक आहे येथून पुणे शहरात तसेच निगडी ते भोसरी मार्गे आळंदी अशा वाहतुक सेवा चालतात. तसेच निगडी- मुंबई महामार्ग असल्यामुळे येथे खुप मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, याच चौकातुन प्राधिकरण- रावेत आणि भोसरी एम.आय.डी.सी आणि तळवडे आय.टी पार्क कडे जाण्याचा मार्ग आहे, निगडी हे बसस्थानकाचे प्रथम स्थान असल्यामुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिक येथे येत असतात. शेजारीच फ क्षेत्रीय कार्यालय, आणि संत तुकाराम व्यापारी संकुल, कोहिनूर आर्केड, एम.जी चेंबर्स असे शासकीय व निमशासकीय कमर्शियल मॉल येथे आहेत यामुळे हजारो नागरिक या भागातुन येजा करतात, शेजारी यमुनानगर, प्राधिकरण निगडी सारखा स्वच्छ व सुंदर भाग असताना मुख्य रस्त्यावरच या शेकडो भिक्षुकांनी ताबा मारला आहे, उघड्यावरच संसार मांडला असुन शहरवासीयांना तेथुन जाताना शरमेने मान खाली घालावी लागत आहे. मुख्य रस्त्याच्या पदपथावर शेकडो भिक्षुकांनी कुटुंबासह ताबा घेतला असुन दिवसेंदिवस यांची संख्या वाढतच चालली आहे, उघड्यावरच त्यांनी संसार मांडला असुन स्वच्छतेला व निगडीच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे त्यामुळे तात्काळ या भिक्षुकांना हटविण्यात यावे.

पिंपरी चिंचवड शहर सध्या स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना भक्ती शक्ती समुहशिल्प चौकातील उड्डाणपुल, देशातील सर्वात उंच भारताचा ध्वज, निगडीतील सर्वात मोठे बसटर्मिनल आणि निगडीपर्यंत असणाऱ्या मेट्रोमुळे निगडीला गौरविण्यात येत आहे, स्वच्छ भारतच्या यादीत आपले शहर पिछाडीवर असण्याचे कारण हे भिक्षुक देखील आहे, प्रत्येक मुख्य रस्त्यावरील त्यांचा अस्वच्छ वावर हे पण प्रमुख कारण आहे त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

निगडीतील या भिक्षुकांना तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी होत असताना प्रशासन याकडे गांभीर्याने का पाहत नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे, याची दखल घेऊन लवकरात लवकर त्यांना हटविण्यात यावे व शक्य असेल तर मानवतेच्या दृष्टीकोनातुन त्यांची दुसरीकडे तात्पुरती पर्यायी व्यवस्था करावी” असे त्यात नमुद करण्यात आले आहे.

Share this: