व्हिडीओ नसीरुद्दीन नव्हे तर अक्षयकुमार गद्दार आहे
या व्हिडिओत अक्षय कुमार म्हणतो, ‘मी तुम्हाला सांगू इच्छितो की, टोरंटो हे माझं घर आहे. मी बॉलिवूडमधून निवृत्त झाल्यावर मी परत येऊन इथेच राहणार आहे’अक्षयकुमारच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर भरपूर चर्चा केली जात आहे. ट्विटरवरील युजर्सने अक्षयकुमारवर खोटी देशभक्ती दाखवल्याचा आणि देशाविषयीचं प्रेम विकून पैसे कमावल्याचा आरोप केला जात आहे. त्याचबरोबर नसीरुद्दीन नव्हे तर अक्षयकुमार गद्दार असल्याचं ट्विटरवर अनेकांनी म्हटलं आहे