बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय मूलनिवासी संघ व भारत मुक्ती मोर्चा महिला संघाच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

बारामती (वास्तव संघर्ष) “ज्ञान नाही विद्या नाही,
ती घेण्याची गोडी नाही,
बुद्धी असुन चालत नाही,
तयाशी मानव म्हणावे का?”
समस्त मानवाच्या वर्तणूकीवर सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक गुलामगिरीवर प्रश्न उपस्थित करून माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी मृतावस्थेतील स्त्री पुरूषांना जीवंत करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतात इ.सनाच्या १८ व्या शतकात केलं. राष्ट्रीय मूलनिवासी संघ व भारत मुक्ती मोर्चा महिला संघ, बारामती युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त बारामतीत अभिवादन करण्यात आले.

भारतीय बहुजन समाजामध्ये स्त्रियांचा हुंकार कायम भिंतीआड दाबला गेला.परकीय आक्रमणाने भारतीय मुळ संस्कृती आणि समाज व्यवस्थाच पूर्णपणे उद्ध्वस्त केली.आर्यांच्या आक्रमणानंतर पितृसत्ताक पद्धती रूढ झाली.त्यामुळे स्त्री ही गुलामगिरीच्या साखळदंडात बंदिस्त झाली.आर्यांच्या पुरुषप्रधान संस्कृतीने तिला केवळ एक उपभोग वस्तू बनविली. रूढी,परंपरा, देवदेवतांच्या कपोलकल्पित खोट्यानाट्या कथांमध्ये तिला गुंतवून ठेवण्यात आले.व्रतवैकल्ये,मंत्र,जप,तप,अनुष्टान,या सारक्या नियमात तिला बांधून ठेवले.त्यांमुळे तिच्यातील प्रतिभा,क्षमता, बुद्धीकौशल्य यासारख्या गुणांचा विकास झाला नाही.जन्मापासून मरेपर्यंत तिने सेवा करावी अशीच व्यवस्था आर्यांच्या धर्मव्यवस्थेने केली.ती कशी त्यागमूर्ती आहे,याचे फसवे आदर्श तिच्यापुढे ठेवण्यात आले.तिच्या कुठल्याच कर्तृत्वाला वाव मिळाला नाही आणि तिनेही निमुटपणे मूक प्राण्याप्रमाणं गुलामवृत्तीत जगण्याची मानसिक तयारी ठेवली.

या सर्व साखळदडांनी बांधलेल्या स्त्री ला खऱ्या अर्थानं कुणी बाहेर काढले असेल तर ते सावित्रीमाई ने आज स्त्री शिकून समाजात मानाने वावरू लागली ती केवळ सावित्री ने स्वतःच्या अंगावर शेण आणि दगड गोटे झेलल्यामुळे.
आणि याचीच परतफेड एक जान म्हणून राष्ट्रीय मूलनिवासी संघ व भारत मुक्ती मोर्चा महिला संघ, बारामती युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी संघ पुणे जिल्हा प्रभारी मा.उषा थोरात यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन ज्योती गायकवाड, अध्यक्ष राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ बारामती युनिट यांचेमार्फत कर्ण्यात आले. तर अनिता शेलार अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा बारामती, तेजस्वी पोळ, संस्थापक अध्यक्ष महामाता रमाई प्रतिष्ठान मूलनिवास महिला संघाच्या दिपाली लोंढे,पूजा लोंढे, प्रतिमा पोळ, व कार्यकारिणी सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.

या वेळी मूलनिवास महिला संघ मार्फत सर्व माता भगिनींना सावित्रीबाई फुले जयंती च्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच “महाराष्ट्र शासनाने या वर्षी घेतलेला महत्वपूर्ण निर्णय म्हणजे “ज्ञानज्योति सावित्री माईंची जयंती “महिला शिक्षण दिन”म्हणून साजरी करणार त्या निर्णयाचे स्वागत व शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले

Share this: