होऊ दे चर्चा ! पिंपरीत गरिबाची ट्रॉली जाण्यासाठी ट्राफिक पोलीसाने थांबवल्या सिग्नलवर गाड्या
दिपक साबळे..! : पिंपरी चिंचवड शहरातील पोलिस कर्मचारी काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरले आहेत. काही पोलीस अधिकारी हे लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ओढले गेले तर काही दिवसांपूर्वी एक महिला ट्राफिक पोलीस रंगेहाथ लाच स्वीकारताना पकडली गेली. यामुळे एकिकडे पोलीस कर्मचाऱ्याच्या विश्वासार्हतेवर लोकांना प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच पिंपरीतील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो सोशलमिडीयावर व्हायरल झाला आहे.
डॉ. आंबेडकर चौक तसा गजबजलेला चौक म्हणून शहरात प्रसिद्ध आहे. या चौकातच जूना मुंबई-पुणे एक्स्प्रेसचा सिग्नल आहे. या सिग्नलवर वाहतूकीचे नियम मोडणा-या नागरिकांवर कार्यवाही करण्यासाठी वाहतूक पोलीस गस्तीवर असतात. शुक्रवारी या चौकातून येणारी वाहने पुणे -निगडी मार्गे येणाऱ्या सिग्नलवर गाड्या थांबल्या होत्या. अशातच सिग्नल सुटला असताना दोन लहान मुलं आपल्या छोट्या भावाला एका बॅगची ट्राॅली रस्ता ओलांडत होते. त्या लहान मुलांना रस्ता मिळावा म्हणून वाहतूक पोलिसाने गाड्या थांबवल्या आणि या मुलांच्या ‘ट्रॉली कार’ला क्रॉसिंग करू दिलं!
दरम्यान, इश्टाग्राम या सोशलमिडीयावरील महाराष्ट्र पोलीस आॅनलाईन या पेजवर सदरील फोटो अपलोड केला असून कमेंटमध्ये पिंपरी चिंचवडमधील त्या वाहतूक पोलीसावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यामुळे आता होऊ द्या चर्चा..!