बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती “महिला शिक्षक दिन” म्हणून साजरी

पिंपरी(वास्तव संघर्ष) :- स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या , थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली , त्यामुळे अनेक स्त्रिया विविध क्षेत्रात कार्यरत आहेत . तथापि त्यांचे कर्तव्य बजावताना आपल्या तब्येतीकडे थोड्याफार प्रमाणात प्रकृतीकडे दुर्लक्ष होते , त्यामुळे आज आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरामुळे त्यांचे आरोग्य अबाधित राहण्यास निश्चित मदत होईल असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त समाजप्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले . त्याचा प्रारंभ रक्तदान , कोरोना रॅपिड तपासणी , नेत्र तपासणी , शारीरिक तपासणी शिबिराने झाला . त्याचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या .

या कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे , स्थायी समिती सभापती संतोष लोंढे , सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके , अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर , माजी महापौर अनिता फरांदे , अपर्णा डोके , डॉ . वैशाली घोडेकर , नगरसदस्या अनुराधा गोरखे , वैशाली काळभोर , प्रियंका बारसे , आश्विनी जाधव , नम्रता लोंढे , रेखा दर्शिले , माजी नगरसदस्य वसंत लोंढे , सुरेश म्हेत्रे , माजी नगरसदस्या गिरीजा कुदळे , जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ . तृप्ती सागळे , मुख्य लिपिक प्रफुल्ल पुराणिक , सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे , भाई विशाल जाधव , देवेंद्र तायडे , अॅड . चंद्रशेखर भुजबळ , योगेश लोंढे , गणेश वाळुजकर , युसूफ कुरेशी , युवराज दाखले , संतोष जोगदंड , शंकर लोंढे , पी के महाजन , हनुमंत माळी , गिरिष महुले , गिरिष वाघमारे , प्रताप गुरव , विजयराव दर्शिले , हाजी रसुल , प्रसाल कुदळे , नसीर शेख , संतोष शिंदे , मारुती काटके , राम जाधव , विशाल शिंदे , मारुती कदम , तेजस्विनी कदम , वैशाली राऊत , सुषमा सोनवणे , अॅड . विद्या शिंदे , वंदना जाधव , सुप्रिया जाधव , रोहिणी रासकर , मिरा कुदळे , अनिता ताटे आदी उपस्थित होते .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती “ महिला शिक्षक दिन ” म्हणून राज्यात सर्वत्र साजरी करण्याबाबत शासनाने नुकताच निर्णय घेतलेला आहे . या कार्यक्रमासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती , आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद , सावित्रीबाई फुले महिला व्यासपीठ , ओबीसी संघर्ष समिती , ओबीसी संघर्ष सेना , महाराष्ट्र परिट सेवा मंडळ , पिंपरी चिंचवड शहर लॉड्री संघटना , सम्यक विद्यार्थी आंदोलन , नागरी हक्क सुरक्षा समिती , वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ . राजेंद्र वाबळे यांनी देखील कार्यक्रम यशस्विततेसाठी प्रयत्न केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले .

Share this: