बातम्या

पिंपरीतील गांधीनगर पुर्नवसन प्रकल्पास विरोध, पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ रहिवाशांचे ठिय्या आंदोलन

पिंपरी(वास्तव संघर्ष) :पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीतील नागरिकांनी एसआरए पुर्नवसन प्रकल्पास विरोध करण्यासाठी आज (शुक्रवारी ) रोजी आंदोलन करण्यात आले.पिंपरीतील गांधीनगर येथे येत्या काळात पुर्नवसन प्रकल्प होणार आहे. प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला. वर्षानुवर्ष स्वतःच्या या जागेवर आम्ही रहात असून पुनर्वसनासाठी रहिवाशांना विश्वासात घेतले नाही, गांधीनगर झोपडपट्टीतील पुर्ण जागेवरच आहे त्या ठिकाणीच पुर्नवसन करावे पालिकेने तीनशे सेकरफुट जागा न देता पाचशे स्केअर फुट जागा द्यावी तसेच अकरा मजली इमारत बांधण्यापेक्षा सात मजली इमारत बांधावी . या प्रकल्पात जाणूनबुजून फसवणूक केल्याचा आरोप गांधीनगर येथील रहिवाश्यांनी केला आहे. शासनाने आमचा विश्वासात केला आहे असेही नागरिक म्हणाले.

पुनर्वसन प्रकल्पास विरोध दर्शविण्यासाठी रहिवाशांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रवेशद्वाराजवळ हजारोंच्या संख्येने ठीय्या आंदोलन करत पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या

दरम्यान, खासगी मालकीच्या आणि महापालिका मालकीच्या जागेवर गांधीनगर वसले आहे . 62 हजार 714 चौरस मीटर क्षेत्रफळावर वसलेल्या या झोपडपट्टीच्या जागेवर खेळाचे मैदान , दवाखाना , माध्यमिक शाळा , किरकोळ बाजार , उद्यान , डिपी रस्ता आदींचे आरक्षण आहे . पंतप्रधान आवास योजनेंतर्गत या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला जाणार असल्याने भूखंड ताब्यात घेण्याकामी जागा मालकास 100 कोटी रुपये मोबदला द्यावा लागणार आहे.

Share this: