स्वाधार योजनेची हक्काची रक्कम विद्यार्थ्यांना मिळेना ;महाविकास आघाडी सरकार छुपे जातीवादी – किरण फुगारे
नांदेड (प्रतिनिधी) अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विध्यार्थ्यांच्या भोजनाची व निवासाची सोय व्हावी. यासाठी मागील युती सरकारने चालू केलेली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेतून विध्यार्थाचे शैक्षणिक हितसंवर्धन व्हावे हा या योजनेचा उद्धेश होता.
कोरोनाचे जागतिक संकट जगावर घोगवत असताना सर्वत्र लोकडोवन परिस्थिती कित्येकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यात मोट्या प्रमाणात अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा बहुतांश समावेश आहे. अचानक झालेल्या लॉकडाउनमुळे बहुतांश विध्यार्थाचे सामान त्यांच्या भाड्याच्या रूममध्ये आहे. त्यामुळे रूममालक विध्यार्थाना जेवण पुरविण्यासाटी खानावळीचे मालक पैसासाठी तगदा लावतायत. अश्या परिस्थितीत बड्या भांड्वलदाराना कोट्याधीची मदत करणारे महाविकास आघाडीचे सरकार मागासवर्गीय विध्यार्थाच्या हक्काची तुटपुंजी रक्कम देण्याबाबत चकार शब्दही काढण्यास तयार नाही. यावरून या सरकारची जातीवादी भूमिका असल्याचे मत विध्यार्थी व्यक्त करत आहेत.
बऱ्याच विध्यार्थी संघटनांनी सामाजिक न्याय व विशेष सह्य विभागासाठी ई -मेल वरून संपर्क साधला असताना कुठल्याही प्रकारची ठोस उत्तरे संबंधित विभागाकडून मिळत नसल्याने विध्यार्थ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. तरी शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील पात्र विध्यार्थाना त्वरित योजनेचा लाभ द्यावा. आणि आर्थिक संकटात सापडलेल्या अनुसूचित जातीच्या विध्यार्थाना जीवदान द्यावे. अशी मागणी विध्यार्थी करत आहेत.
महाविकास आघाडी सरकार छुपे जातीवादी:-किरण फुगारे विध्यार्थी प्रतिनिधी नांदेड.
अनुसूचित जातींचे प्रवर्गातील विध्यार्थी कोरोनाच्या परिस्थिती अत्यन्त हलाकीचे दिवस जगत आहे. खाणावळ व रूम मालकाकडून थकीत भाड्यासाठी विध्यार्थ्यांकडे तगादा लावलेला असताना. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभार्थीना लाचारीचे जीवन जगावे लागत आहे. त्यांच्या हक्काची रक्कम त्यांना न देणारे कितीतरी पुरोगामीत्वच्या बाता मारत असले तरी महाविकास आघाडी सरकार हे छुपे जातीवादी आहे असे वाटत आहे.शैक्षणिक वर्ष संपत आले आसताही आद्यापही स्वाधारची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नाही.
तरी स्वाधारची पुर्ण रक्कम दाहा दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी अन्यथा मागासवर्गीय विद्यार्थी विरोधी भुमिकेच्या विरोधात लोकडावुनच्या नियमाचे पालन करुन तिव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबादारी सामाजिक न्याय मंत्री व मुख्यमंत्री साहेबांची आसेल.आसे निवेदन मेलदुवारे सामाजिक न्याय मंत्री व मुख्यमंञ्याना विद्यार्थी प्रतिनिधी नांदेड किरण फुगारे यांच्याकडून पाठवण्यात आले आहे.