क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

जुन्या केसवरून दोघांमध्ये मारहाण 

पिंपरी (वास्तव संघर्ष) :जुनी केस मागे घे म्हणत महिला व एका व्यावसायीकामध्ये भांडणे व मारहाण झाली आहे. यातून दोघांनीही दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.7) चोवीसवाडी परिसरात घडली.

याप्रकऱणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून दत्ता कारभारी कायंदे (वय 37 रा. दिघी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.या तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी यांच्या घरात घुसून यापुर्वी केलेली केस मागे घे म्हणत आरोपीने शिवीगाळ करत दगडाने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली

.

तर दत्ता कायंदे यांनीही संबंधीत महिले विरोधात तक्रार दिली असून, महिलेने जुनी केस संदर्भात बोलण्यासाठी घरी बोलावून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली, हाताला चावा घेतला व लोखंजी रॉड पायावर मारून कायंदे यांना जखमी केले. यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share this: