क्राईम बातम्याबातम्यामहाराष्ट्र

नगरमध्ये “सैराट”हत्याकांड प्रकरणी मयत मुलीच्या वडिलांना पुण्यात अटक

अहमदनगर – नगरमध्ये सैराट चित्रपटाप्रमाणे केलेल्या ‘ऑनर किलिंग’मधील मयत मुलीच्या वडिलांना पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथून अटक करण्यात आली आहे. रामा रामफल भरतिया हे अटक केलेल्या वडिलांचे नाव आहे

याप्रकरणी पारनेर पोलिसांनी यापूर्वी मयत मुलीचा मामा घनशाम राणेंज व काका सुरेंद्रकुमार भरतिया यांना अटक केली आहे. रामा भरतिया हे फरार होते. आज पित्यालाही अटक करण्यात आली आहे.

 

निघोज येथे गवंडी व्यवसाय करणारे मंगेश चंद्रकांत रणसिंग (वय २३) हे १ मे रोजी त्यांची पत्नी रुख्मिणी मंगेश रणसिंग (वय १९) यांना भेटण्यासाठी निघोज येथे वाघाचा वाडा येथे गेले होते. त्यावेळी रुक्मिणी हिने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तिला व तिचा पती मंगेश या दोघांना घरात कोंडून पेटवून देण्यात आले होते. या ‘ऑनर किलिंग’च्या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

 

सविस्तर वृत्त असे कि आंतरजातीय विवाह केला म्हणून नवविवाहित जोडप्याला अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नगरमध्ये घडली,. यामध्ये मंगेश रणसिंग हा युवक गंभीर जखमी झाला होता त्याची पत्नी रुख्मिणी रणसिंग हिचा पुणे इथं ससून हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगेश आणि रुख्मिणी यांनी सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. पण हा विवाह रुख्मिणीच्या घरातील लोकांना मान्य नव्हता. त्यामुळे तिच्या माहेरच्या लोकांनी रागातून 2 महिन्याची गर्भवती असणाऱ्या रुख्मिणीला तिच्या पतीसह अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं, अशी माहिती आहेयामध्ये रुख्मिणीचा मृत्यू झाला असून मंगेश हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 1 मे रोजी घडली असून या संतपाजनक प्रकाराने नगरमध्ये खळबळ उडाली आहे.

Share this: