एकवेळ घरी बसेन मात्र भाजपमध्ये प्रवेश करणार नाही – माजी महापौर योगेश बहल
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरात सन 2022 रोजी निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके यांनी दावा केला आहे की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीतील तसेच शिवसेनेतील अनेक नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. येत्या काळात ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
याबाबत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे जेष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी नामदेव ढाके यांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे ते म्हणाले, नामदेव ढाके यांचे हे विधान म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत तसेच मोदी लाटेच्या जिवावर जे नगरसेवक निवडून आले आहेत.
त्या भाजप नगरसेवकाची नावे तरी शहरातील नागरिकांना माहिती आहेत का असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आज आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत बहल बोलत होते पार्थ पवार यांनी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसची मशाल हाती घेऊन येत्या निवडणुकीत नवोदित कार्यकर्त्या संधी देणार आहे. जर तुम्हाला येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीने टिकीट नाकारले तर तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का? या पञकारांच्या प्रश्नावर योगेश बहल म्हणाले येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीने टिकीट नाकारले तर एकवेळ घरी बसेन मात्र भाजपमध्ये प्रवेश करणार नाही.