आरोग्यबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

स्तुत्य उपक्रम :प्लाझ्मा दान करणा-या व्यक्तीस महापौर माई ढोरे यांच्याकडून एक हजारांचे बक्षीस

पिंपरी (वास्तव संघर्ष) :कोरोना या संसर्गजन्य आजाराने संपुर्ण जग त्रस्त आहे. या महामारीत पिंपरी चिंचवड शहर देखील अडकले आहे.कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या शहरासाठी डोकेदुखी ठरली आहे. सगळीकडे या महामारीने मानवजातीला हैराण करून सोडलेले आहे. वयस्कर व ईतर दुर्धर आजर असणाऱ्यांना यातुन सावरण्यास खुप जड जात आहे. तसेच त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असल्यामुळे त्यांचे दगावण्याचे प्रमाण जास्त आहे.

यावर उपाय काय? तर ज्यांची कोरोना होऊन २८ दिवस पूर्ण झालेत अश्या सर्व सदृढ व सशक्त जणांनी त्यांच्या शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती प्लाझ्माच्या रूपात देऊन आपण २ नागरिकांचे प्राण वाचवु शकता. अशा प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तींना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे हे एक हजार रुपये बक्षीस म्हणून देणार आहेत.


रेमडेसिव्हिर इंजेक्शन पेक्षाही जास्त महत्वाचे प्लाझ्मा आहे आणि तो आपल्या सर्वांकडे आहे. सर्व प्रकारे आपण मदत तर करतोच आहोत पण प्लाझ्मारूपी मदत ही खूप मोलाची असेल. प्रत्येक प्लाझ्मादान करणा-या व्यक्तीला महापौर माई ढोरे यांच्याकडून 1000 रू बक्षिस रूपी मदत केली जाणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त जणांची या स्तुत्य उपक्रमात सहभाग घेऊन प्लाझ्मा दान करत एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी मदत करा.. आज आपल्या शहराला आपली गरज आहे त्यावेळी आपण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले पाहिजे व या कोरोना रुपी राक्षसाला एकजुटीने हरवले पाहिजे.

प्लाझ्मादान नाव नोंदणी संपर्क
9049613700 निलेश
9527425202 अक्षय
9595150505 जे.डी.

Share this: