निदर्शने करणा-या तब्बल तीस जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) :”प्रशासनाचा धिक्कार असो,लहुजी वस्ताद की जय..!राडा घातल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही आज राडाच घालयचा” अशा घोषणाबाजी निदर्शने करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तीस जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 18) रोजी दुपारी दोनच्या सुमारास महाविर चौक चिंचवड येथे घडली आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पतंगे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार सुरज दरशथ कांबळे ( वय-25, रा. अनुसया कॉलनी दत्तमंदिर रोड , वाकड) व इतर 29 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) सह 135 अन्वये पारित केलेल्या आदेशाचा भंग व सी.आर.पी.सी 149 प्रमाणे दिलेल्या नोटीस मधील आदेशाचा भंग आरोपी यांनी केला आहे. आरोपींनी चिंचवड येथील महाविर चौक ते पुणेकडे जाणा-या रस्त्यावरील रहदारीस अडथळा निर्माण करून त्यांच्या हातातील पिवळे झेंडे दाखवून “प्रशासनाचा धिक्कार असो, लहुजी वस्ताद की जय..! राडा घातल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही, आज राडाच घालयचा” अशा घोषणाबाजी करून निदर्शने केली.
तेव्हा पोलीस बंदोबस्तावरील इतर स्टाफने सदर आरोपींना रहदारीस अडथळा करु नका अशा सुचना देवुन त्यांना रहदारी अडथळा करण्यापासुन प्रतिबंध करीत असताना या आरोपीनी पोलीसांच्या सुचनांचे पालन न करता , रस्त्यावर थांबुन राहुन पोलीस करत असलेले कायदेशीर कर्तव्यात अडथळा निर्माण केला आहे. त्यानुसार तीस आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.