पिंपरी चिंचवड शहरात ३६ वर्षीय पुरूष कोरोनाग्रस्त ;शहरामध्ये आजपर्यंत एकुण २१ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह
पिंपरी (वास्तव संघर्ष) महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे त्यातच आता पिंपरी चिंचवड शहरात ३६ वर्षीय पुरूष करोना बाधित आसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत ०१ ने वाढ होऊन दाखल झालेल्या रुग्णाचा ०९ झालेली आहे त्यामुळे शहरामध्ये आजपर्यंत एकुण २१ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत . या पैकी १२ रुग्ण होऊन घरी गेले आहेत.
दरम्यान, उर्वरित ०९ रुग्ण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे . त्यांचेवर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत . तसेच पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणा-या नागरिकांची आजपर्यंतची संख्या १८७३ असून त्या सर्वांनी किमान १४ दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील 21 दिवस घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे ..
तसेच सूचनांचे पालन न करणाऱ्या होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून सूचनांचे उल्लंघन करणा – या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेऊन कारवाई केली जाईल .तसेच या आदेशाचे उल्लघन करणाऱ्यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे असे आवाहन महापौर उषा माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे .