१०० वर्षांपूर्वीच्या पटकीच्या महाभयंकर रोगाला लढा देणाऱ्या महानायक फकिराप्रमाणे कोरोना व्हायरसचा लढा देऊ – सचिन साठे
दिपक साबळे..! (वास्तव संघर्ष) :-फकिरा’सारखी जबदरस्त साहित्यकृती, ‘वारणेचा वाघ’सारखा चित्रपट देणारे तुकाराम भाऊराव साठे तथा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या योगदानाचा वेध घेणारे तसेच फकिरा या कादंबरीत आण्णा भाऊ साठे यांनी वास्तववादी कथा मांडली होती.
आजपासून १०० वर्षांपूर्वीच्या पटकीच्या महाभयंकर रोगाला लढा देणाऱ्या महानायक फकिरा व या रोगाच्या काळात जन्म घेऊन इतिहास घडवणाऱ्या साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांचे आपण वंशज आहोत कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्वांनी आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या असे आवाहन साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे नातू तथा मानवहित लोकशाहीर पार्टीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या घरी जाऊन केले आहे .
सचिन साठे यावेळी फकिरा यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, आज जगात आणि देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे, असा एक महाभयंकर रोग शंभर वर्षीपुर्वी पटकी या नावाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता अशावेळी फकिरा यांनी बहुजनातील आणि इतर जातीतील लोक उपाशी पोटी झोपू नये यासाठी फकिरा यांनी इंग्रजांकडील सोने चांदीचा खजीना लुटून तो लोकांना दान केला त्यामुळे महानायक फकिरा यांचा आदर्श घेऊन आपल्या समाजातील कोणताही व्यक्ती उपाशी पोटी राहू नये यांची प्रत्येकाने काळजी घ्यावी.