Video गरज पडल्यास पुन्हा भीमा कोरेगाव घडवू-चंद्रशेखर आजाद
वास्तव संघर्ष आॅनलाईन :दिल्लीतील जंतर मंतरवर भीम आर्मीची हुंकार रॅली मध्ये भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी दलितांवर होणा-या अत्याचाराची आठवण करून देत . आमच्यावर असेच अत्याचार होत असल्यास आणि गरज पडल्यास आम्ही पुन्हा भिमाकोरेगाव घडवू अशी चेतावणीच मोदी सरकारला दिली.
मोदी सरकार आमच्यासोबत अन्याय करत आहेत. मुलायम सिंग बोलतात मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवा. पण मी बोलतो की आपला जीव गेला तरी चालेल पण मोदीनां पुन्हा प्रधानमंत्री बनवू नका. मत द्यायच्या आधी रोहित वेमुला आठवा. कोणी गोळी चालवली, ते आठवा. कुणी आपल्या माणसांना मारले ते आठवा. अत्याचारी अत्याचारी असतो. भीमा-कोरेगाव पुन्हा घडवू. अद्याप त्याची गरज पडली नाही. मात्र देशाच्या संविधानावर संकट येईल तेव्हा भीमा कोरेगाव घडवू’अशी चेतावनी चंद्रशेखर आझाद यांनी दिली .