बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांनी घराबाहेर पडू नये ; प्रशासनास सहकार्य करावे – राहुल भोसले

पिंपरी  (वास्तव संघर्ष ) – कोरोना विषाणू चे संकट संपूर्ण जगावर असताना संपूर्ण देशाबरोबरच पुणे शहरातील कोरणा विषाणू संसर्ग प्रादुर्भावा च्या पार्श्‍वभूमीवर लागू असलेली संचारबंदी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून अधिक कडक करण्यात आली असून पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 पूर्ण पणे बंद करण्यात आलेला आहे. दिनांक 12 एप्रिल पासून ते 13 एप्रिल पर्यंत या दोन दिवसासाठी हा प्रभाग पूर्णपणे सील करण्यात येणार असल्याचे महानगरपालिके कडून घोषित करण्यात आले आहे.

 या दोन दिवसात भाजीपाला ,किराणा , दूध पुरवठा सारख्या जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने देखील पूर्णपणे बंद राहणार आहे तरी प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांनी व सर्व व्यापारी दुकानदार मंडळींनी याची नोंद घ्यावी. व प्रशासनास सहकार्य करावे व नागरिकांनी या दिवसात कुठल्याही प्रकारच्या कामासाठी घराबाहेर पडू नये असे आवाहन माजी विरोधी पक्ष नेते नगरसेवक  राहुल भोसले, नगरसेवक समिर मासूळकर, नगरसेवक वैशाली घोडेकर नगरसेवक गिता मंचरकर यांनी नागरिकांना केले आहे.

Share this: