पिंपरी चिंचवड शहरातील सरकारी आणि खाजगी दवाखान्यामध्ये नागरिकांची मोफत कोरोना स्वँपची तपासणी होणार – मयूर कलाटे
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरीकांची कोरोना (कोविड १९ ) स्वँपची तपासणी मनपाच्यावतीने सरकारी व खाजगी दवाखान्यामध्ये मोफत होणार आहे. आज झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समिती सभेमध्ये शहरात वाढत जाणा-या कोरोना बाधितांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.
कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने सर्वपक्षीय सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामुळे मयुर कलाटे यांनी शहरातील नागरीकांची कोविड स्वँपची तपासणी मोफत करण्याबाबत ऐनवेळीचा विषय मांडला त्याला राष्ट्रवादी कॉग्रेसचे सदस्य पंकज भालेकर यांनी अनुमोदन दिले. व सदरचा विषय मंजुर करण्यात आला. लवकरच यांची अंमलबजावणी होऊन शहरातील नागरीकांनी कोविड १९ स्वँपची तपासणी मोफत करण्यात येईल त्यामुळे शहरातील नागरीकांना दिलासा मिळेल.