बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छूक नगरसेवकांची नावे पाठवा-अजित पवार

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे नगरसेवकांची बैठक घेवून विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छूक असलेल्यांची नावे पाठविण्याचा आदेश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहराध्यक्षांना दिला आहे.

तसेच यावेळी जावेद शेख यांना संधी देण्याचे ठरले होते. पण, दुर्दैवाने त्यांचे निधन झाले असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री पवार आज (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवड शहर दौ-यावर होते. त्यांनी कोरोनासाठी केल्या जाणा-या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादीच्या इच्छूक नगरसेवकांनी विरोधी पक्षनेतेपदाचा विषय त्यांच्यासमोर मांडला.

ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, वैशाली घोडेकर यांनी आपण इच्छूक असल्याचे अजितदादांना सांगितले.

त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा पक्षाचा निर्णय आहे. इच्छुकांची पत्रे मला मिळाली आहेत.त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक घ्यावी. इच्छुकांची नावे मला पाठवावीत, असा आदेश त्यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना दिला आहे

Share this: