दणका बातमीनंतर पिंपरीतील कोहिनूर वायोना गृहसंस्थेला पालिकेची नोटीस.
वास्तव संघर्ष
पिंपरी-महानगरपालिका शेजारी असलेले कोहीनूर वायोना गृहसंस्थेला अनधिकृत बांधकामासंदर्भात वास्तव संघर्ष ने बातमी टाकल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका खडबडून जागी झालेली दिसते बातमीनंतर कोहिनूर वायोना गृहसंस्थेला महापालिकेने अनधिकृत बांधकाम पाडण्यासंदर्भात नोटीस बजावली असून १५ दिवसाच्या आत अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काय लिहलं आहे नोटिशीत?
पिंपरीतील सि.स.नं ४७०२/१ येथे कोहिनूर वायोना सहकारी गृहरजना संस्था आहे.या संस्थेत पार्किंगच्या जागेत सोसायटीच्या आँफिचे वाढीव बांधकाम ,अनधिकृत मंदिर,पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जागेवर तसे त्या रस्त्यावर उभारलेले लोखंडी प्रवेशद्वार यासह येथील सदनिकाधारकांनी विनापरवाना बाल्कनी बंदिस्त केल्याबाबत विनोद भालेराव यांनी महापालिकेकडे तक्रारअर्ज केला होता.या संदर्भातील वृत्त वास्तव संघर्ष ने प्रकाशित केले होते.यामुळे महापालिकेच्या अधिका-यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली असता.पालिकेनी मंज़ूर नकाशात दर्शविल्याव्यतिरिक्त विनापरवाना अनधिकृत बांधकाम आढळून आले आहे दरम्यान हे अनधिकृत बांधकाम १५ दिवसाच्या आत हटवावे अन्यथा या बांधकामावर कार्यवाई करण्याची नोटीस बजावण्यात आली असून तक्रारदाराला धमक्याही येत आहेत.
तक्रारदारास धमकी दिली जात आहे
कोहिनूर वायोना सोसायटीच्या अनागोंदी कारभाराबाबत मी वास्तव संघर्ष च्या माध्यमातून चव्हाट्यावर आणल्यानंतर सोसायटी ही बाहेरून स्वच्छ दिसत असली तरी आतील सदनिकाधारकांनी अक्षरक्षा पिंपरी-चिंचवड महापालिकेची दिशाभूल करत फसवणूक केली आहे सोसायटीत अनधिकृत बांधकामात केलेला भष्ट्राचार उघडा झाला आहे.या बांधकामासंदर्भात मला मानसिक त्रास दिला जात आहे,सोसायटीच्या सभासदाच्या नातेवाईकाकडून ‘तू हा विषय घेऊ नकोस नाहीतर तुला जिवंत मारलं जाईल याचे परिणाम नाईट होतील आताच माघारी घे गाठ आमच्याशी आहे.अशा प्रकारची धमकी मला दिवसाढवल्या रसत्यात अडवून दिली जात आहे .अनधिकृत बांधकामाबाबत महापालिका सकारात्मक आहे अधिकारी मला सहकार्य करत आहेत १५ दिवसात बांधकाम हटवावे अशी नोटिस दिल्यामुळे मी चिंतेत नाही.मला धमकी देणा-या कोहिनूर वायोनातील सभासदाची व त्यांच्या नातेवाईकांची पोलिस प्रशासनाने चौकशी करावी अन्यथा होण्या-या जिवितहानीस प्रशासन जवाबदार असतील
विनोद भालेरावउपाध्यक्ष -लोकजनशक्ती पार्टी अल्पसंख्याक