येवले अमृततुल्य चहा वादाच्या भोवऱ्यात, अंधश्रद्धा व अफवा पसरविण्यांचा आरोप
पुणे(वास्तव संघर्ष ) पुण्यात वेगवेगळ्या शाखा असलेलं’येवले अमृततुल्य’चहा वादाच्या भोव-यात अडकण्याची शक्यता आहे.अल्पावधित प्रसिद्ध झालेला ‘येवले अमृततुल्य’ हा चहा चर्चेचा विषय झाला आहे.
‘येवले चहा,एकदा पिऊन तर पहा’आमचा चहा पिल्यावर पित्त होत नाही, अशा आशयाची जाहीरात करत अमृततुल्यनं नागरिकांना आवाहन केलं आहे या जाहीराती संदर्भात डॉ.बच्छाव यांनी आक्षेप घेतला आहे.
ते म्हणतात ‘दुधाचा चहा पिल्यावर पित्त होत नाही असा दावा करणेच चुकीचे आहे,कोणीही डॉक्टर किंवा तज्ञ देखील यांची गँरटी देऊ शकत नाही की,चहा पिल्यावर पित्त होत नाही.मग येवले आणि साईबा अमृततुल्य चहा यांची खात्री कशी काय देतात ?सरळ-सरळ नागरिकांच्या आरोग्यांशी खेळून त्यांची फसवणूक करणे आणि नागरिकांच्या खिशातून पैसै काढणे हाच केविलवाणा यांचा प्रयत्न आहे,
जर अमृततुल्य चहा पिल्यावर पित्त होत नसेल तर पित्तावर इलाज म्हणून औषध देणारे आमच्यासारखे डॉक्टर वेडे आहेत का?मग आमच्या शिक्षणांच्या डिग्र्या काय कामाच्या? पुढे ते म्हणतात अमृततुल्य या शब्दाने देखील त्यांनी नागरिकांची दिशाभूल तर केलीच अंधश्रद्धा व अफवा पसरविली आहे.
अमृत कसं आहे कुणीच पाहीलं नाही मग हे अमृतासमान चव कशी देऊ शकतात ? या चहा विक्रेत्यांनी अमृत पाहीले का हा देखील संशोधनाचा विषय आहे .सदर दुकानाच्या जाहीरातीत बदल करावा आणि एफ.डि.आयच्या नियमाप्रमाणे त्यांनी दुकानात चहाचा परवाना लावावा.अशी मागणी डॉ.बच्चाव यांनी केली आहे
वास्तव संघर्षशी बोलताना येवले आणि साईबा अमृततुल्य चहा व्यवस्थापक म्हणाले’ पुण्यामध्ये येवले अमृततुल्य चहाच्या ३२ ते ३४ शाखा आहेत तसेच साईबा अमृततुल्य चहाच्या ४०ते४२ शाखा आहेत सदर जाहीरात आम्ही मार्केटिंगच्या दुष्ट्रीने केली आहे प्रत्येक व्यवसायाचा मार्केटिंगचा एक फंडा असतो त्यानुसार आमचाही हा मार्केटिंग फंडाच आहे.तरीदेखील आम्ही चहा बनवण्यासाठी वापरत असलेली साखर केमिकलविरहीत असून चहातील मसालादेखील तसाच आहे त्यामुळे आम्ही खात्रीशीर म्हणतो की आमचा चहा पिल्यावर पित्त होत नाही,’अमृततुल्य’हा आमचा ट्रेडमार्क असून त्याचा अर्थ अमृत असा होत नसून अमृतासमान चहा असा त्यांचा अर्थ होतो यामध्ये काय गैर आहे असे आम्हाला वाटत नाही,जर तसे असेल तर तक्रारदारांने आम्हाला भेटावे