बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

“चला देऊया मदतीचा हात, आपल्या बांधवाना आपली गरज आहे,”- नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांचे भावनिक आवाहन

पिंपरी (वास्तव संघर्ष) सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरामुळे उध्वस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व स्तरांतूनप्रयत्न होत होत आहे. अशा संकटात अवघा महाराष्ट्र एकजुटीने पूरग्रस्तांना मदत करताना दिसत आहे. पण हि मदत आणखी काही दिवस सलगपणे देणे गरजेचे असून पूरग्रस्त बांधवांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांना महाराष्ट्राच्या मदतीची गरज आहे. आपल्या बांधवाना आपण सर्वांनी मिळून जमेल तशी मदत करायला हवी असे भावनिक आवाहन राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांनी केली आहे.

 संत तुकाराम नगर, महात्मा फुलेनगर, लांडेवाडी, काळभोरनगर व रामनगर या भागातील नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी पूरग्रस्त बांधवांना मदत म्हणून विविध जीवनावश्यक वस्तू जमा केल्या होत्या. दोन ट्रक भरलेली हि मदत नगरसेविका सुलक्षण शिलवंत आणि वैशाली काळभोर यांनी पूरग्रस्त बांधवांपर्यंत पोहचवल्या. सांगली येथे त्या पोचल्या असता त्या ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून परग्रस्तांची सर्वोतोपरी मदत करणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांनी एक ट्रक सांगली येथे तर दुसरा ट्रक कोल्हापुर ला पाठवण्यास सांगितले.

 जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी स्वतः जातीने सुलक्षणा शिलवंत यांच्या सोबत जाऊन कोल्हापुरातील मुस्लिम वसतिगृह या ठिकाणी सर्व साहित्य पोहोच केले. हि मदत गरजू गावांपर्यंत पोहचवण्याचे काम ते करत आहेत. या मध्यवर्ती ठिकाणावरुन संपूर्ण जिल्ह्यात मदत पोहचवली जाते. कोल्हापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने या परिसरात अजूनही मदत पोहोचली नसल्याचे यावेळी दिसून आले. या भागातील पूर परिस्थिती खूपच भयानक असून अनेक गावे उध्वस्त झाली आहेत. अजूनही तिथे पाऊस पडत असून सर्वत्र पाणी भरलेले आहे. या परिस्थतीतून सावरण्यासाठी नागरिकांना महाराष्ट्रभरातून मिळत असलेली मदत अशीच कायम राहायला हवी असे आवाहन नगरसेविका धर यांनी केले आहे.

अवघ्या दोनच दिवसात संत तुकाराम नगर, महात्मा फुलेनगर, लांडेवाडी,काळभोरनगर व रामनगर या भागातील नागरिकांनी दोन ट्रकभर जीवनावश्यक साहित्याची मदत केल्याबद्दल सर्व स्तरांतून नागरिकांचे कौतुक होत आहे. येत्या काळात खाद्यपदार्थांसोबतच औषधे, कपडे, भांडी, संसार उपयोगी अशा वस्तूंची मदत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Share this: