बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

शेखरभाऊंकडून महिलांना राखीची हृदयस्पर्शी भेट;पिंपरी विधानसभेत महिलांचा आत्मसन्मान वाढविणारा उपक्रम

पिंपरी(वास्तव संघर्ष) – पिंपरी परिसरातील माता भगिनींचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि पिंपरी विधानसभा निवडणुकीचे प्रबळ दावेदार शेखर ओव्हाळ यांनी राखी पौर्णिमेचे औचित्य साधून एक आगळावेगळा उपक्रम राबविला. कुटुंबसंस्कृती टिकवणाऱ्या, सुदृढ समाज घडवणाऱ्या महिलांचा मान राखण्यासाठी त्यांनाच राखी पाठवण्याचा नवा पायंडा ओव्हाळ यांनी पाडला असून या अनोख्या हृदयस्पर्शी भेटीमुळे महिलावर्गही भारावून गेला आहे.

जवळपास 10 हजार महिलांना शेखर ओव्हाळ यांनी राखी पाठविली आहे. शेखर ओव्हाळ म्हणाले की, भावाने आपले रक्षण करावे म्हणून बहीण त्याला राखी बांधते, ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. परंतु बदलत्या काळाबरोबर सगळ्या गोष्टी बदलत आहेत. महिला कमकुवत नसून त्याही पुरुषांसारख्या सामर्थ्यवान आहेत. विविध क्षेत्रात महिलांनी स्वतःचा ठसा उमटविला आहे. महिला हीच आपल्या कुटुंबाची, पर्यायाने आपल्या राज्याची आणि देशाची खरी रक्षणकर्ती आहे. महिला आहेत म्हणूनच आपली कुटुंबसंस्कृती टिकून आहे. समाजात स्वतःला सिद्ध करताना स्त्री कुटुंबावरील मायेचा पदर हटू देत नाही.

महिलांच्या या कर्तव्याप्रती ऋण व्यक्त करण्यासाठीच मी हि राखी माता-भगिनींना पाठवण्याचा निर्धार केला. महिला आणि तरुणींसाठी सध्या समाजात भीतीचे वातावरण आहे. अगदी दोन ते तीन वर्षाच्या मुलींपासून वयस्कर महिलांवर अत्याचार होताना दिसते. महिलावर्ग एका दहशतीखाली वावरताना दिसतो. त्यांना सुरक्षित वातावरण देण्याची गरज आहे. समाजातील निम्मा घटक असलेल्या महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांसारखी, किंबहुना त्यांच्यापेक्षा सरस कामगिरी बजावली आहे. त्यांना समानतेची वागणूक देण्याबरोबरच सुरक्षिततेचीही खात्री देणे गरजेचे आहे.

या पार्श्वभूमीवर अनिष्ट गोष्टींपासून त्यांचे संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक महिला भगिनीला मी सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगण्याची खात्री देईन, असा निर्धारही शेखर ओव्हाळ यांनी व्यक्त केला.   दरम्यान, महिलांचा सन्मान वाढवणाऱ्या या उपक्रमाबाबत महिलावर्गाने शेखर ओव्हाळ यांचे आभार मानले आहे. पिंपरी मतदार संघात या अनोख्या उपक्रमाची चर्चा सुरु आहे. 

Share this: