बातम्यामहाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांची पुरग्रस्तांशी नाळ, दत्तक घेतलं गाव ‘ब्रह्मनाळ’

सांगली (वास्तव संघर्ष) सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील ब्रम्हऩाळ गावात पुराचे पाणी घुसले असतांना स्थानिक गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यात बोट पाण्यात उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या गावावर शोककळा पसरलेली आहे. याच पुरग्रस्त गावाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हे गाव दत्तक घेतले आहे.

पुरग्रस्त ब्रम्हनाळ गावातील 700 कुंटुंब, 3500 लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. ब्रम्हनाळ गावात बोट अपघातात काही नागरिकांचे निधन झाले होते. या संकट काळात ब्रम्हनाळ गाव प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतल्याचे कळताच गावचे संरपंच व गावक-यांनी समाधानी व्यक्त केलं आहे.

ग्रामपंचायतीने पत्र देऊन आम्ही पुनर्वसनासाठी आमचे गांव देत आहोत असं जाहीर केले आहे.अनेक गावात पुराने हाहाकार माजवला असल्याने अनेक कुटुंब बेघर झाले आहे. त्यामुळे सर्वत्र पूरग्रस्तांना मदतीची हाक सर्वत्र देत आहे. अशातच बाळासाहेब आंबेडकर यांनी पूरग्रस्तांना दिलेली मदतीची हाक कौतुकास्पद आहे.

Share this: