स्थायी समितीत भाजपा आणि राष्ट्रवादीच्या ८ नव्या सदस्यांची निवड
पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर आठ नवीन सदस्यांची आज निवड करण्यात आली.महापालिका स्थायी समितीच्या 8 सदस्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. त्यांच्याजागी नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी भाजपसह राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी अर्ज मागविले होते. त्यावर अनेक नगरसेवकांनी अर्ज केले होते. त्यातील निवडक सदस्यांना स्थायीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.
निवड झालेल्या सदस्यांमध्ये भाजपच्या शशिकांत कदम, आंबादास कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे यांना संधी मिळाली आहे. तर, राष्ट्रवादीच्या नगरसेविका पौर्णिमा सोनवणे आणि सुलक्षणा धर यांना संधी मिळाली आहे