बातम्या

संभाजी ब्रिगेडच्या पदाधिका-यांचा छावा मराठा संघटनेत प्रवेश

पिंपरी । प्रतिनिधी : रायगड जिल्हा संभाजी ब्रिगेडमधील पदाधिकार्‍यांनी संभाजी ब्रिगेडला राम राम ठोकत छावा मराठा संघटनेत प्रवेश केला. जुनी सांगवी येथे छावा मराठा संघटनेचे संस्थापक किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर आणि पुणे जिल्हा अध्यक्ष व कोकण विभाग संपर्क प्रमुख रामभाऊ जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात या पदाधिकार्‍यांनी छावा मराठा संघटनेत प्रवेश केला. यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन गवांडे पाटील, नाशिक जिल्हा अध्यक्ष अण्णा खाडे, निखील पांगारकर, संपत पगार, निलेश शेवाळे, सुमित लोहारे, गणेश सोनवणे, गणेश कांबळे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये रायगड जिल्हाध्यक्षपदी नितीन पवार यांची नियुक्ती करण्यात आली. याबरोबरच सचिन राठोड (बिरवाडी शहर प्रमुख), तुळशीराम वाडकर (महाड शहर प्रमुख), शरद देशमुख (महाड शहर उपाध्यक्ष), राकेश गायकवाड (रायगड जिल्हा संपर्कप्रमुख), ज्ञानेश्‍वर धनावडे (महाड तालुका उपाध्यक्ष), दिनेश पवार (महाड तालुका अध्यक्ष) यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी बोलताना किशोर चव्हाण म्हणाले, समाजात होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पदाधिकार्‍यांनी केले पाहिजे. छावा मराठा संघटना राजकारणात प्रवेश करणार नाही. परंतु संघटनेतील एखाद्या पदाधिकार्‍याला राजकारणात जायचे असेल, तर संघटना पूर्ण सहकार्य करेल. विलास पांगारकर यांनीही पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सचिन गवांडे पाटील यांनी, तर आभार रामभाऊ जाधव यांनी मानले.

केंद्रात मराठा आरक्षणासाठी 26 डिसेंबरपासून दिल्लीत आंदोलन केंद्रात मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र, ओबीसींवर अन्याय झाला नाही पाहिजे. मराठा समाजाला केंद्रात आरक्षण मिळावे आणि ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी येत्या 26 डिसेंबरपासून नवी दिल्ली येथे मराठा आरक्षण कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात हार्दिक पटेल यांनाही सोबत घेणार आहोत. संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही चव्हाण यांनी केले.

 

Share this: