बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी ताबडतोब निर्णय घ्या-ॲड. नितीन लांडगे

पिंपरी (वास्तव संघर्ष ) पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रशासनाने दिलेले आश्वासन अनेकदा फोल ठरले आहे. पुर्ण दाबाने व सुरळीत पाणी पुरवठा व्हावा हि सर्व लोकप्रतिनिधींची मागणी आहे. मागील पंधरा दिवसांपासून शहरातील सर्वच भागातील नागरिकांच्या पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. यावर आयुक्तांनी ताबडतोब निर्णय घेऊन सर्व शहरातील पुर्ण दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करावा असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी बुधवारी दिले.

बुधवारी (दि. 1 डिसेंबर) ॲड. नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्य प्रशासन भवन कै. मधुकरराव सभागृहात स्थायी समितीची 251 वी सभा झाली. या सभेत सुमारे 6 कोटी 77 लाख रुपये खर्चास मंजूरी देण्यात आली..

कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंट बाबत केंद्र व राज्य सरकारने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास 92 टक्के नागरिकांनी पहिला आणि 60 ते 62 टक्के नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी. मास्क वापरावा आणि सामाजिक अंतर पाळावे असेहि आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी केले.

Share this: