बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

आयुक्तांनी केले महापौर आणि लोकप्रतिनिधींना पुन्हा ‘नाराज’

पिंपरी(वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड महापालिकेतील आयुक्त राजेश पाटील आणि महापौर नगरसेवक यांच्यातील वाद मंगळवारी आणखी चिघळला. गेल्यावेळी फुले सृष्टी आणि शाहू सृष्टीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी  आयुक्त  पाटील हे गैरहजर होते. त्यावेळी आयुक्तांनी राजशिष्ठाचाराचा भंग करत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता मात्र राष्ट्रीय हॉकी स्पर्धेला लाखो रुपयांचा खर्च पिंपरी चिंचवड महानगरपालिका करणार आहे त्या कार्यक्रमाच्या पञकार परिषदेत महापौर स्थायी समितीचे अध्यक्ष आणि क्रिडा सभापती यांनाच निमंञण नव्हते. त्यामुळे आज या लोकप्रतिनिधींनी पुन्हा आपली आयुक्तांबाबतची नाराजी व्यक्त केली आहे

हॉकी इंडिया यांच्या मान्यतेने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेची घोषणा करण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराच्या महापौरांना निमंत्रण देण्यात आले नाही. याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

हॉकी इंडिया यांच्या मान्यतेने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘11 वी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा 2021’ हि स्पर्धा 11 ते 22 डिसेंबर या काळात होणार आहे. पिंपरीतील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे होणा-या स्पर्धेसाठी 32 लाख 25 हजार 974 रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली.

या स्पर्धेची घोषणा बुधवारी महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त आणि संबंधित संस्थेच्या पदाधिका-यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन केली. परंतू यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या महापौरांना डावलण्यात आले असा प्रश्न ॲड. नितीन लांडगे यांनी उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली.

Share this: