बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचा आयुक्त राजेश पाटील यांचा आदेश

पिंपरी (वास्तव संघर्ष) :कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमायक्रॉन  आढळून आला असून व जागतिक आरोग्य संघटना ( W.H.O. ) ने सदर विषाणू प्रकारास Variant Of Concern म्हणून जाहीर केले आहे . सदर विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी या विषाणू विरोधी प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील शाळा बंद ठेवण्याचा आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

पाटील यांनी प्रसिध्दीपञकाच्या माध्यमातुन सांगितले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इ 1ली ते इ . 7 वी चे वर्ग सुरु करण्यास 15 डिसेंबर 2021 पर्यंत स्थगिती देण्यात येत आहे . कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन इ .1ली ते इ . 7 वी चे वर्ग सुरु करणेबाबत पुढील आदेश निर्गमित करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इ. 1 ली ते इ .7 वी चे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंद राहतील . मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील. संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील .

कोरोना संसर्गाच्या प्रार्दुभावामुळे केलेल्या च्या प्रतिबंधासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे / मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणा-या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  सदर आदेश बुधवार (दि.1) पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील असे आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

Share this: