नवीन मोबाईल दोन दिवस वापरण्यासाठी पाहीजे म्हणून नातेवाईकांनी केला लपांस ;चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चिखली (वास्तव संघर्ष) :नवीन मोबाईल हफ्त्यांवर घेतलेला पाहून नातेवाईकाने दोन दिवस वापरायला नेला. मात्र तो मोबाईल फोन परत न करता नातेवाईकांने लपांस केला याबाबत संबंधित नातेवाइकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी साने चौक चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
चंद्रकात महादेव शेळवणे (वय 33, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.
किसन भानुदास शेळवणे उर्फ कृष्णा शेळवणे (वय 38, रा. त्रिवेणीनगर चौक, तळवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत यांनी साने चौक चिखली येथील एका दुकानातून 47 हजार 900 रुपये किमतीचा मोबाईल फोन हफ्त्यांवर खरेदी केला. मोबाईल फोन घेऊन दुकानाच्या बाहेर येताच आरोपी किसन इनोव्हा कारमधून तिथे आला.
‘नवीन मोबाईल घेतलास काय, बघू कोणता आहे. हा मोबाईल छान आहे. मी दोन दिवस कसा चालतो ते पाहून तुला परत देतो’ असे म्हणून नवा कोरा मोबाईल घेऊन किसन त्याच्या इनोव्हा कारमधून निघून गेला.
चंद्रकांत यांनी किसनकडे मोबाईलची वारंवार मागणी केली. मात्र, त्याने मोबाईल देण्यास टाळाटाळ करून चंद्रकांत यांचा विश्वासघात केला. तसेच आरोपीने चंद्रकांत यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे