सर्व मालमत्तांवर आकारण्यात येणारा सहा महिन्यांचा मालमत्ताकर माफ ;मानवी हक्क संरक्षणाच्या मागणी यश
पिंपरी(वास्तव संघर्ष) – कोरोना महामारी रोखण्यासाठी केलेला लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या पिंपरी – चिंचवड शहरवासीयांना दिलासा देणारा निर्णय पालिकेने घेतला आहे . शहरातील निवासी , व्यावसायिक , औद्योगिक अशा सर्व मालमत्तांवर आकारण्यात येणारा सहा महिन्यांचा मालमत्ताकर माफ करण्यास महापालिका सभेत मंजुरी देण्यात आली आहे.
याबाबत मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी मा. मुंख्यमंत्री उध्दव ठाकरे, प्रदान सचिव महाराष्ट्र राज्य, नगर विकास सचिव ,महाराष्ट्र राज्य व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली होती. सदर निवेदनाची दखल घेवून पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर माई ढोरे तसेच सर्व राजकीय प्रतिनिधी, आधिकारी, यांनी आडचणीच्या काळात सहा महिन्याचा मालमत्ता कर माफ करण्याचा अतिशय चांगला निर्णय स्थायी समीतीच्या सभेत घेतला.
पिंपरी -चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे . त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास आहे . पिंपरी – चिंचवड औद्योगिक परिसरालगतच हिंजवडी आयटी पार्क , तळवडे आयटी पार्क , चाकण , , रांजणगाव एमआयडीसी हा भाग येतो . या भागात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत . संपूर्ण देशभरातून या भागात कामगार वर्ग रोजगारानिमित्त वास्तव्यास आहे . मात्र , या भागात अंतर्गत रस्ते , पाणी , वीज अशा मुलभुत सुविधा अद्यापही अपु – या आहेत . त्यामुळे येथील कामगार वर्ग पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास प्राधान्य देतो .
याचाच परिणाम आयटी पार्क आणि एमआयडीसी लगतच्या पिंपरी -चिंचवड महापालिका हद्दीत बांधकामांचे प्रमाण वाढले आहे . पिंपरी -चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाखांवर पोहोचली आहे . सन 2007-08 मध्ये शहरात 2 लाख 54 हजार 247 मालमत्ता होत्या . सध्या 5 लाख 30 हजार मालमत्ता आहेत . यावरून शहराची वाढ लक्षात येते .