बातम्या

पिंपरी चिंचवड हादरलं: एकाच कुटुंबातील चौघांचा जळून मृत्यू

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडमधील पूर्णानगर येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास एका दुकानाला आग लागली आगीच्या या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. आगीनंतरची कुलिंग प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड येथील दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 4 नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग बुधवारी पहाटे पाच वाजता लागली होती.

चिमणाराम बेणाराम चौधरी( वय 48),नम्रता चिमणाराम चौधरी(वय 40),भावेश चिमणाराम चौधरी (वय 15),सचिन चिमणाराम चौधरी( वय 13 )असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या चोघांची नावे आहेत. सदर कुटुंब हे राजस्थान मधील पाली जिल्ह्यातील आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूर्णानगर चिंचवड येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास एका दुकानाला आग लागली होती. या आगीनं काही वेळात रौद्ररूप धारण केलं. ही आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये पसरली. या घटनेत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन विभागाच्या जवानांनी चार मृतदेह बाहेर काढले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलं नसल्याची माहिती समोर आली आहे.

Share this: