निगडीत जिवंत महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जखमी केलेल्या महिलेचा अखेर मृत्यू
निगडी (वास्तव संघर्ष) : जिवंत महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जखमी झालेल्या महिलेचा आज दिनांक 25 बुधवारी पहाटे सहा सातच्या सुमारास पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिनांक 17 नोव्हेंबर गुरुवारी चारच्या सुमारास निगडी येथे खून करण्याच्या उद्देशाने महिलेला पेट्रोल टाकून मारण्याचा प्रयत्न झाला होता .याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शितल सचिन बंदपट्टे (वय-34 रा. निगडी)असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या माघारी दहा महिन्याची चिमुकली आहे.
दिनांक 17 नोव्हेंबर रोजी गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास मयत शितल बंदपट्टे या आरोपी अलीशा शेख हिस माझ्या पतीसोबत लग्न का केले असे विचारण्यासाठी गेली तेव्हा तीच्या अंगावर पेट्रोल ओतुन घेवुन तीला जखमी केले . त्यानंतर मयत शितलला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले माञ आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
मयत शितल बंदपट्टे यांचा पती सचिन बंदपट्टे आणि आरोपी अलीशा शेख व तिची बहीण फरार असून निगडी पोलीस त्यांच्या मागावर आहेत.