देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे भाजपा नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्यावर गोळीबार
देहूरोड (वास्तव संघर्ष) कॅन्टोमेंट बोर्डाचे भाजपा नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. फक्त नशीब बलवत्तर असल्याने भाजपा नगरसेवक बचावले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विशाल खंडेलवाल यांच्यावर गोळीबार झाला आहे. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या हल्ल्यातून नगरसेवक विशाल खंडेलवाल थोडक्यात बचावले आहेत. गोळीबार झाला तेव्हा धावू लागले आणि रस्त्यावर पडले ज्यामुळे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. खंडेलवाल यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार का केला हे समजू शकलेले नाही. देहूरोड पोलीस या अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. हल्ल्यामागचे कारण काय? हेदेखील स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड कँन्टोमेंट बोर्डाचे भाजपा नगरसेवक विशाल खंडेलवाल हे त्यांच्या देहूरोड बाजारपेठेतील कार्यालयाच्या बाहेर सायंकाळी साडेसात च्या सुमारास मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. तेव्हा, दुचाकीवरून आलेल्या दोघां पैकी एकाने त्यांच्या दिशेने गोळी झाडली. मात्र, ती सुदैवाने त्यांना न लागल्याने थोडक्यात बचावले. स्वतः चा जीव वाचवण्यासाठी ते धावत सुटले त्यांचा तोल जाऊन ते रस्त्यात पडले आणि किरकोळ जखमी झाले. नगरसेवक विशाल खंडेलवाल या घटनेमुळे अत्यंत घाबरले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून अज्ञात गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध देहूरोड पोलीस घेत आहेत.